अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असतानाही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारले आहे. पांडुरंग उचितकर असे या व्यक्तीचे नाव आहे.
पांडुरंग उचितकर यांचे वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील रहिवाशी आहेत. केकत उमरा येथे पांडुरंग हे पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत संसाराचा गाडा ओढत आहे. मात्र अंध चेतन याची समस्या पाहून त्यांचे मन हेलावले.

यानंतर त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्या झोपडीत 15 अंध मुले जमा झाली. सुरुवातीला या सर्व मुलांचा सांभाळ करताना कठीण दिवस काढावे लागले. मात्र आज हीच 15 मुले अंध असताना पांडुरंग यांचे आधार झाले आहेत.
या सर्वांनी मिळून एक ऑर्केस्ट्रा काढला. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकतात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले.
पण अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने ती देखील वेळ निघून गेली. यातील अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. पांडुरंग यांनी जन्मताच अंध असलेल्या मुलाच्या जीवनात प्रकाश टाकून त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण केली आहे.
जवळपास 15 अंध मुलांना सहाय्य करुन केले आहे. त्यांच्या पालन- पोषणसह संपूर्ण शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोन अंध जोडप्याचा विवाह देखील त्यांनी लावून दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम