FD Plan : गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ! ‘या’ बँकांच्या विशेष एफडी योजना लवकरच होणार बंद !

Sonali Shelar
Published:
FD Plan

FD Plan : सणासुदीच्या या हंगामात तुम्ही देखील चांगली गुंतवणूक योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, कारण येथील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. तसेच अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी ऑफर करतात, या अंतर्गत गुंतवणूदार चांगला परतावा मिळवू शकतात.

तुम्हालाही या सणासुदीच्या हंगामात बचत करायची असेल तर, इंडियन बँक, IDBI बँक, आणि एसबीआय बँक यांनी अद्भुत योजना सुरू केल्या आहेत. ज्याची शेवटची तारीख फक्त ३१ ऑक्टोबर पर्यंत आहे. याचा अर्थ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही वेळ शिल्लक आहे. चला तर मग बँकांच्या या खास एफडी आणि व्याजदराबद्दल जाणून घेऊया.

IDBI बँकेची खास योजना

या योजनेवर नियमित योजनेपेक्षा जास्त व्याज मिळत असल्याने बँकेने याला विशेष म्हटले आहे. IDBI बँकेने 375 आणि 444 दिवसांसाठी योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये 375 दिवसांवर 7.10 ते 7.60 टक्के आणि 444 दिवसांवर 7.15 ते 7.65 टक्के व्याज मिळते.

इंडियन बँक खास योजना

दुसरीकडे, इंडियन बँकेने 400 दिवसांसाठी खास एफडी योजना आणली आहे. ज्यामध्ये 10,000 हजार रुपयांसह 2 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना 7.25 टक्के ते 7.75 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. एवढेच नाही तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ टक्के दर निश्चित करण्यात आला आहे.

एसबीआय बँक खास योजना

इंडियन बँकेने 300 दिवसांसाठी FD प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 7.05 टक्के ते 7.80 टक्के परतावा मिळतो. देशातील सर्वात मोठी बँक SBI सध्या FD वर 6.80 टक्के ते 7.10 टक्के व्याज देत आहे. याचा अर्थ असा की 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तुम्हाला चांगला परतावा घेण्याची उत्तम संधी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe