कोरोनाच्या भीतीने कृषी विद्यापीठात होणाऱ्या लष्कर भरतीला स्थगिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती.

मात्र जिल्यात कायम असलेला कोरोना तसेच करोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात.

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्या वतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे.

ही भरती सोल्जर जनरल ड्युटी, नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe