अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून बळीराजा आत्महत्या करत असल्याच्या घडतच आहे. राहुरी तालुक्यातील कणगर येथे कर्जाला कंटाळून काल दि. 19 फेब्रुवारी रोजी तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कनगर- तांभेरे रोडवरील माळवाडी परिसरातील शेतकरी बापूसाहेब लक्ष्मण हापसे(वय-45) हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यांना अडीच एकर शेती आहे.
शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. थकीत कर्जामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात वावरत होते. . दरम्यान शेतकरी बापूसाहेब हापसे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते.
त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.दरम्यान काल शुक्रवारी दुपारी एका शेतात पडक्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला. साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असे मृतदेहाच्या स्थितीवरून दिसून आले. दरम्यान घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते.
हापसे यांचा मृतदेह साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत बापूसाहेब हापसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved