‘ह्या’ तालुक्यातून पंतप्रधानांना मराठा आरक्षण बाबत पन्नास हजार पत्र !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वतीने पंतप्रधानांना नेवासे तालुक्यातून पन्नास हजार पञ पाठवल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष कमलेश नवले यांनी सांगितले .

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने एक पत्र मराठा समाज च्या । युवकांच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प करण्यात आला आहे.

त्यानुसार तालुक्यातून पन्नास हजार पत्र पाठवण्याच्या मानस अध्यक्ष नवले यांनी केला आहे . यावेळी तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, शहर अध्यक्ष गणेश गव्हाणे,विद्यार्थी सेनेचे सचिव अविनाश गाढवे, तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश जंगम,

तालुका उपाध्यक्ष योगेश काळे,विभाग अध्यक्ष रविंद्र पिंपळे,तालुका संघटक तुषार शेळके,मयुर नरोडे,अक्षय बोधक,पप्पू बोधक,आप्पासाहेब आरगडे, प्रतिक आरगडे, विशाल तुपे, चंद्रकांत आरगडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe