अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- संगमनेरमधील इक्विटास स्माल फायनान्स या बँकेच्या उपशाखा अधिकाऱ्याने कर्जदारांच्या १ लाख ५४ हजार रुपये रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याप्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इक्विटास स्माल फायनान्स या बँकेचा उपशाखा अधिकारी राहुल बाळासाहेब गोडसे याने कर्जदारांकडून १ लाख ५४ हजार रुपयाची रक्कम वसूल केली होती.
त्याने सदर रक्कम बँकेत भरण्याऐवजी स्वतः साठी वापरली. सदर रक्कम बँकेत भरण्यासाठी त्याला सांगण्यात आले होते.
मात्र त्याने ही रक्कम बँकेत न भरल्याने बँकेचे शाखाधिकारी प्रदीप मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसानी राहुल गोडसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम