अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- लेखणीची ताकद जगातील अन्यायाला वाचा फोडणारी असते. मात्र याचा काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहे. आपले गैरआर्थिक चक्र फिरवण्यासाठी काहीजण खोट्या बातम्या प्रसारित करतात. असाच काहीसा प्रकार नेवासा मध्ये उघड झाला आहे.
काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशा प्रकारचे लिखाण करून , बदनामीकारक मजकूराची बातमी तयार करून ती पेपरला न देता व्हाट्सएपच्या ,
फेसबुक या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केली यामुळे नेवासा काँग्रेसने केलेल्या तक्रारीमुळे नेवासा पोलीस ठाण्यात त्या बातमीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा याठिकाणी रेमडीसीविर काळाबाजार विक्री प्रकरणी आरोपींना तातडीने जेरबंद करून याची सखोल चौकशी करून रुग्णांना भरपाई मिळून देण्यासाठी,
न्याय मिळवून देण्यासाठी नेवासा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर चार तास धरणे आंदोलन दिले.
आंदोलनाची दखल घेत शनिशिंगणापूर पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह , इतर आरोपींना अटक केली, यामुळे नेवासा काँग्रेसने नियोजित रस्ता- रोको आंदोलनास स्थगिती दिली.
परंतु अज्ञात बातमीदाराने खोडसाळपणा करत नेवासा काँग्रेस पक्षाने शनिशिंगणापूर पोलिसांशी हातमिळवणी करून मोठ्या रकमेची तडजोड करून आंदोलन मागे घेतले अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली.
यामुळे पोलिसांसह काँग्रेस पक्षाची बदनामी झाल्याने नेवासा काँग्रेस पक्षाच्या वतीने नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधित बातमीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम