बनावट सोने प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये 365 बनावट सोन्याच्या पिशव्या आढळून आल्या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 159 खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अर्बन बँक बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले होते त्यांना या प्रकरणी लक्ष देऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती त्यानुसार आज हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

अर्बन बँकेत ठेवलेल्या तब्बल 27 किलो 351 ग्रॅम सोनेतारण ठेवल्यालेल्या 367 पिशव्यांपैकी 347 पिशव्यांमध्ये खोटे सोने, तर इतर 20 पिशव्यांमध्ये सोन्याच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज मंजूर करत बँकेची फसवणूक व 5.30 कोटींच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी 159 कर्ज खातेदारांसह गोल्डव्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेचे शेवगाव शाखाधिकारी अनिल वासुमल आहुजा (वय 56) यांनी याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरण चर्चेत आहे. पहिल्यांदा फेब्रुवारी 2020 मध्ये शेवगाव शाखेतील 380 पिशव्यांचे लिलाव आयोजित करण्यात आले होते.

यात 6 लिलाव पार पडले. नंतर तीन पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. इतर पिशव्यांमध्येही बनावट सोने आढळून येण्याची शक्यता असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती इतर 344 पिशव्यांमधील दागिने बनावट आढळून आले.

त्यामुळे एकूण 159 कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर विशाल दहिवाळकर यांनी व त्यांना सहकार्य करणार्‍या इतरांनी बँकेत तब्बल 27 किलो 351 ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून कर्जापोटी एकूण 5 कोटी 30 लाख 13 हजारांच्या रकमेची उचल घेऊन त्याची परतफेड न करता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व कर्जाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शेवगाव शाखेचे शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी शेवगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe