अखेर राज्यातील ‘त्या’ भाजप आमदारावर गुन्हा दाखल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीबाबतचा बंदी आदेश असताना देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता झरे ते पारेकरवाडी या रोडलगत असले नियोजित मैदानामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

ही बैलगाडा शर्यत होऊ नये यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासन यांनी गोपीचंद पडळकर यांचे मनपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ही शर्यती होऊ नये, म्हणून संचारबंदी आदेश लागू केले होते. तरी देखील बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने आमदार पडळकर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलगाडा शर्यत आयोजकांना बैलगाडी शर्यती घेऊ नये म्हणून नोटीस बजावणी केलेली असताना तसेच कोविड १९ चे अनुषंगाने पारित करण्यांत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या

कार्यकर्त्यासह बेकायदेशीर विनापरवाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग करुन कोणत्याही प्रकारे बैलगाडी शर्यतीसंदर्भात परवानगी न घेता तसेच बैलगाडी शर्यती संदर्भात नियम, नियमावली ठेऊन सदस्य नोंदणी करुन त्यांना बक्षिस जाहिर केले. तसेच बैलगाडी शर्यतीचे रितसर आयोजन न करता केवळ आपण सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाद्वारे बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले.

झरे गावी बैलगाडी शर्यती घेणार अशा केलेल्या वक्तव्यास दुजोरा देण्यासाठी परस्पर काही बैलगाड्या बोलावून नियोजित ठिकाणीखेरीज वाक्षेवाडी गट नंबर ३१९-१/२ या जागेमध्ये त्यांनी बैलगाड्या पळवून शर्यती घेतल्या आहेत. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर व त्यांचे इतर ४० कार्यकर्ते यांच्यावर आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News