अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर-जामखेड रस्तावरील टाकळी काझी गावानजीक हमरस्त्याचे मधोमध उभा असलेला अनावश्यक टोल नाका अखेर भुईसपाट झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून दुरावस्थेच्या स्वरूपात ऊभा असलेला हा टोल नाका अपघाताचे कारण ठरत होता.
महामार्ग अधिकाऱयांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्या पुढाकारात काल शिवसैनिकांनी आपल्या शिवसेना स्टाईलने टोलनाका भुईसपाट करीत रस्त्याच्या श्वास मोकळा केला.
नगर- जामखेड रस्त्यावर दशकापूर्वी टाकळी काझी गावानजीक हा टोलनाका अस्तित्वात आला. पुढे टोल वसुली करणे थांबले. त्यासही अनेक वर्षे उलटली. मात्र रस्त्याच्या मध्यभागी जीर्ण अवस्थेत हा टोलनाका उभा होता. दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या नजरेत अडथळ्यांचे आणि त्यामुळे अपघाताचे कारण अशी या टोलनाक्याची ओळख झाली. मागील पंधरा दिवसात त्या ठिकाणी चार अपघात झाले.
तीन दिवसांपूर्वी एक ट्रक या टोलनाक्यास धडकून रस्त्यावर पलटी झाला. त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. सदरची माहिती टाकळीचे ग्रामस्थ यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना सांगितली.
त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदर बाब महामार्ग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी कार्यवाही करतो, असे सरकारी उत्तर दिले.त्यामुळे अजून अपघात होऊन प्राणहानी व वित्तहानी होण्यापेक्षा शिवसैनिकांनीच टोलनाका हटविण्यासाठी पुढाकार घेतला. संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक होत ताबडतोब जेशीबी व ट्रॅक्टर बोलावून टोल नाका उद्धवस्त केला.
- किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|