…अखेर पुणे जिल्ह्याची वीज तोडली?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एकीकडे वीजबिलासाठी वीजवितरण कंपनी शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन कट करत आहे. मात्र दुसरीकडे हीच कंपनी नगर जिल्ह्यातील गावे अंधारात ठेवून शेजारील पुणे जिल्हयातील गावांना मात्र बिनादिक्कत वीजपुरवठा केला जात होता.

स्थानिक नागरिकांना वीज बिलासाठी वेठीस धरणाऱ्या या अन्यायकारक भूमीकेविरुद्ध यापूर्वी कोणीही दखल घेतली नाही.परंतु तालुक्यातील शेतकरी तसेच घरगुती वीज कनेक्शन बाबतच्या या ज्वलंत असलेल्या प्रश्नाबाबत सुजित झावरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी तालुक्यातील वीज पुणे जिल्ह्यातील काही गावांना देण्यात येत होती हे मा.उपअभियंत्यांनी मान्य केले करत आमच्यावर पुणे जिल्ह्यातील वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात येत असल्याने आम्हाला नाईलाजाने पुणे जिल्ह्यातील काही गावांना वीज जोडण्यात आल्याचे कबुल केले होते.

मात्र आता पुन्हा पुणे जिल्ह्याला वीज जोडणार नसल्याचे सांगितले. तसेच काही दिवसात तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर