अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतने दशक्रिया विधीवर बंदी घाली असून धार्मिक विधीदेखील बंद करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. ग्रामपंचायतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले,
की गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. पुणतांबा हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे चांगदेव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर मयत व्यक्तींचे दशक्रिया विधी होत आहेत.
दशक्रिया विधी करणारे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
ग्रामपंचायतने दशक्रिया विधी व इतर धार्मिक विधींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या नियमांचे उल्लंघन केल्यास दशक्रिया विधी करणाऱ्या पुरोहितांवर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल,
तसेच दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|