अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्चिमेला लागून असलेल्या सावेडी रस्त्यावर बांधण्यात आलेले अनधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
तसे लेखी पत्र दिल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला चांदबिबी महालावर होणारे कवटी कडेलोट आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले आहे. दोन वर्षानंतरही प्रेमदान हडकोतील रस्त्यावरील गाळ्यांचे अतिक्रमण जैसे थे त्या परिस्थितीमध्ये होते.
प्रेमदान हडकोच्या पश्चिमेला लागून असलेल्या सावेडी रस्त्यावर अनाधिकृत गाळे बांधून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिकांचा रहदारीचा रस्ता बंद झाला असून, नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. महापालिकेने सदर अतिक्रमण बेकायदेशीर विनापरवाना झाले असल्याचे जाहीर करुन पाडण्याचा हुकूम केला होता.
दोन वर्षे उलटून देखील सदरचे अतिक्रमण पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. महापालिकेने संबंधीत जागा मालकास नोटीस बजावल्याने गाळ्याचे पक्के बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याने महापालिकेच्या तीन जबाबदार अधिकार्यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार होते. मात्र महापालिका प्रशासनाला आंदोलनाच्या इशार्यामुळे जाग आली आहे. आंदोलन केल्याशिवाय नागरिकांना त्यांचे हक्क मिळत नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम