अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अधिकाराचा गैरपवापर करून फायनान्स कंपनीच्या दोन व्यवस्थापकांनी कंपनीलाच बनावट कागदत्रांद्वारे पात्र नसलेल्या व्यक्तीच्या नावे ३३ लाखांचे एक व दुसरे ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंतर संबंधित व्यक्तीने कुठलाही हप्ता न भरल्याने कंपनीने विचारपूस केली असता सादर कागदपत्रांवर दिलेला पत्ता तिसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/11/l_froud-2.jpg)
याप्रकरणी कर्ज घेतलेली व्यक्ती सर्फराज सिद्दिकी, सेल्स मॅनेजर विशाल जाधव आणि पत मॅनेजर भूषण देविदास बाविस्कर यांच्या विरोधात क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलटी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी गणेश जयराम चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. अदालत रोडवर असलेली एलटी फायनान्स गृहकर्ज पुरवते. मार्च २०१८ मध्ये सर्फराजने त्यांच्याकडे गृह कर्जासाठी अर्ज केला होता.
कंपनीचे विक्री प्रतिनिधी कमल सखा मल्टि सर्व्हिसेसने सर्फराज कर्जासाठी अयोग्य असल्याचा शेराही दिला होता. पण तरीही सेल्स मॅनेजर विशाल जाधव यांनी भूषणला बावीस्कर यांना सरफराजच्या व्यवसायाची व घराची पाहणी मी केली असून
त्यांना कर्ज द्यावे, असे ईमेलद्वारे सांगितले.भूषणला ते मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही त्याने पदाचा गैरवापर करत कर्ज मंजूर केले. त्यासाठी आवश्यक मूल्यांकन रिपोर्टही बनावट तयार केला. शिवाय घराच्या खरेदीखतावर १२० चौरस फूट जागा असताना
मूल्याकन रिपोर्टमध्ये ३०० चौरस फूट जागा दाखवली.हे करून त्यांनी त्याला ३१ लाख आणि ६५ हजार रुपयंाचे कर्ज मंजूर केले. २७ हजार रुपयांचा हप्ता सुरू झाल्यानंतर मात्र सर्फराजने त्याची फेड केली नाही.
कर्जखाते थकीत झाल्याने कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी कादपत्रांमध्ये नमूद पत्त्याची शहानिशा केली असता ती दुसऱ्याच्याच मालकीची असल्याचे समोर आले. सर्फराज हा तेथे राहतच नसल्याचे कळल्याने हा घोटाळा उघडकीस आला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|