अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गुरुवारी (दि.1) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्प मध्ये गावातील 9 व वाळुंज येथील 1 असे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार दि. 2 ते दि. 6 या कालावधीत पहाटे सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत गाव बंद राहणार आहे.

नगर तालुका शहराजवळ असल्याने शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तालुक्यात सध्या जास्त पेशंटची संख्या ही अकोळनेर वडगाव गुप्ता, शिंगवे, अरणगाव, नेप्ती, नवनागापूर, खंडाळा, निंबळक, बुऱ्हाणनगर येथे असून आता त्या पाठोपाठ साकतखुर्द चा नंबर लागला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना आता गोवोगावच्या उंबऱ्या पर्यंत येऊन ठेपला असताना मात्र ग्रामीण भागातली लोकं निष्काळजी पणाने वागताना दिसत आहेत.
साकतखुर्द येथे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अकोळनेरच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी सुद्धा गावपातळीवर पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
 - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
 













