Flipkart Sale : फ्लिपकार्टवरून कॅश ऑन डिलिव्हरीवर ऑर्डर केल्यास काळजी घ्या, नाहीतर तुम्हालाही भरावा लागेल ‘हा’ अतिरिक्त चार्ज

Flipkart Sale : जवळपास सगळे व्यवहार हे डिजिटल (Digital) झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

परंतु, तुम्ही फ्लिपकार्टवरून (Flipkart) कॅश ऑन डिलिव्हरीवर ऑर्डर (Cash On Delivery Order) करत असाल तर काळजी घ्या, नाहीतर तुम्हालाही अतिरिक्त चार्ज भरावा लागेल. हा चार्ज (Online Order) कसा टाळावा ते जाणून घेऊ.

कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय

कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) म्हणजे ग्राहकाला वस्तू डिलिव्हरी केल्यानंतरच ग्राहक वस्तूचे पैसे देतो. मात्र, आता फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरीवर (Flipkart Cash on Delivery) अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, ज्याद्वारे ग्राहकाला त्यावर अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

कॅश ऑन डिलिव्हरीवर हे शुल्क असेल

फ्लिपकार्टने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की डिलिव्हरी चार्ज हा छुपा चार्ज नाही आणि विक्रेत्याच्या शिपिंग पॉलिसीनुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यापूर्वी फ्लिपकार्ट कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरसाठी शुल्क आकारत नव्हते.

आता तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पॉलिसी अंतर्गत रु. 150 किंवा रु. 15,000 चे उत्पादन ऑर्डर करत असलात तरी, लागू असल्यास, डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त तुम्हाला प्रति ऑर्डर 5 रुपये द्यावे लागतील.

शुल्क टाळा

फ्लिपकार्टवर, जेव्हा ग्राहक कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडतो तेव्हा हा संदेश देखील दिसतो – “हँडलिंग खर्चामुळे, हा पर्याय (सीओडी) वापरून केलेल्या ऑर्डरसाठी नाममात्र 5 रुपये आकारले जातील.

आता ऑनलाइन पैसे देऊन हे शुल्क टाळा” . याचा अर्थ, हाताळणीच्या खर्चापोटी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरसाठी 5 रुपये आकारले जातील. हे शुल्क ऑनलाइन भरून टाळता येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe