शेवगाव तालुक्यात आकाशातून झाली छत्रपतींवर पुष्पवृष्टी…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यामुळे आज राज्यभर मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी करण्यात येणार आहे.

यातच नुकतेच शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरम्यान दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विनोद पाटील यांच्या सौजन्याने हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील व शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते.

या वर्षीही दोन दिवस ही ऐतिहासिक पुष्पवृष्टी केली जाणार असून शुक्रवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला निमगावच्या शिवस्मारक स्थळावर असलेल्या शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरम्यान आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सकाळी शिव पालखी मिरवणूक, शिव छत्रपती शिवाजी महाराज आरती, शेख सुभानअली मुंबई यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News