वेळ पाळा अन्यथा; होऊ शकते ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय कामकाजांच्या वेळा पाळने गरजेचे आहे.

अनेक  अधिकारी व कर्मचारी कामकाजाचे वेळ पाळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जर यापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळली नाही, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.

असा इशारा उपमहापौर भोसले यांनी दिला. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अचानकपणे उपमहापौर भोसले यांनी मनपा मुख्य कार्यालय भेट दिली. यावेळी शिपायाची कामकाजाची वेळ सकाळी साडेनऊ वाजता आहे.

अधिकारी व कर्मचारी  यांच्या कामकाजाची वेळ ९.४५ आहे ११ वाजता देखील मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयात काही कर्मचारी व अधिकारी वेळेवर न आल्याचे निदर्शनास आले.

यावेळी उद्या पासून सर्वांनी  शासकीय वेळेचे पालन करावे अन्यथा निलंबनाला सामोरे जावे लागेल. असे त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेची कामानिमित्त साइटवर जायचं असेल त्यांनी आपल्या कार्यालयाचे संपर्क साधून जाण्याचे कारण सांगावे.

यापुढील काळात नगर मनपाची प्रतिमा उंचवायचीचे आहे. आपण  आपले  कर्तव्यचे  पालन करावे. आपण जनतेचे काम करावे, त्यासाठी आपण जनतेचा मोबदला घेतो यापुढील काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका सहन केल्या जाणार नाहीत.

उद्यापासून अचानक पणे कोणत्याही प्रभाग कार्यालयात भेट दिली जाईल. याची दक्षता घ्यावी अशी माहिती त्यांनी दिली