अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यातून कर्जत पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम होणार असल्याने या इमारतीची शोभा वाढणार आहे.
पंचायत समितीच्या पहिल्या मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली असून या कामासाठी सुमारे ३ कोटी ८८ लाख ६० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. कर्जत येथील पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
पंचायत समितीतील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार पडतात. मात्र, ही जागा अपुरी पडत आहे.
आता या नियोजित पहिल्या मजल्याचे बांधकाम मूळ तळमजल्याच्या इमारतीवर करण्यात येणार आहे. कर्जत येथील पंचायत समितीच्या तळमजल्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधन गृहासह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने तशी व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात येणार आहे.
या बांधकामात ग्रीन संकल्पना राबवण्यात येईल. पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे ६९८.९० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित केले आहे.
प्रशासकीय कार्यालयांचा आमदार पवार यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने होत असलेला कायापालट नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडवण्यासाठी फायद्याचा ठरत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|