पाथर्डी-शेवगाव पाठोपाठ ‘या’ तालुक्यातील मुंडे समर्थकांचे राजीनामे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे पाथर्डी, शेवगाव पाठोपाठ नेवासा तालुक्यातील ५१ कार्यकर्त्यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांनी दिली.

भाजप नेवासा तालुका अध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात कीर्तने यांनी म्हटले आहे की, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण भानसहिवराचे ५१ सदस्य भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.

महाराष्ट्राच्या समाजाच्या लोकनेत्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे आम्ही व सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे.

स्व. लोकनेते मुंडे यांनी पक्षाला अहोरात्र कष्ट करुन बहुजनाचा पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे पक्षाचा वारसा खंबिरपणे पुढे चालवला.

तरी पक्षातील काही लोक त्यांच्यावर अन्याय करत असून तो अन्याय आम्हाला सहन न झाल्यामुळे आम्ही सर्व एक्कावन्न सदस्य भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्याकडे देत आहोत, तरी आपण लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ककेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe