अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत,
यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
जवळपास तासभर या दोन नेत्यांची भेट झाली. जयंत पाटील म्हणाले, या भेटीत देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषायांवर देखील चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत काल चर्चा केली होती.
त्यामुळे शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील मोदींशी चर्चा केली असेल. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. पण मला शरद पवारांनी सांगितलं होतं की या सगळ्या विषयांवर मी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि मी त्यांची भेट घेणार आहे”,
असं पाटील यांनी नमूद केलं. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम