अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- मतदारसंघातील कामांबद्दल मी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात.
नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील शेगुड येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या सुशोभीकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यात प्रा. राम शिंदे बोलत होते.
यावेळी अशोक खेडकर, प्रकाश शिंदे, दादासाहेब सोनमाळी, भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, पप्पूशेठ धोदाड, भारत मासाळ, संदीप सागडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, ‘मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती.
गावात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके चांगली आली. हाच ही कामे योग्य पद्धतीने झाल्याचा पुरावा आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच.’
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम