माजी मंत्री राम शिंदे म्हणतात ; ‘हा’ खरा सर्जिकल स्ट्राईक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कर्जत जामखेड मतदार संघात झालेला विजय हा खरा सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दिड वर्षानी निघाला आहे.

दिड वर्षात मतदार संघात दिड रूपयांचे काम नाही. मात्र निवडणूकी आगोदर मतदारसंघात वेगवेगळे मेळावे घेतले, जनतेला भुलभुलैय्या दाखविला आता जनतेने आमदाराला मेळाव्याबाबत जाब विचारला पाहिजे अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केली.

नगरपरिषद निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे बोलत होते. पुढे ते म्हणाले की,यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना त्रास देत आहे. विजेची कनेक्शन तोडली जात आहेत, भाजपाने पाच वर्षांत एकाही शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले नव्हते.

तसेच मतदारसंघात सध्या हुकुमशाही सुरू आहे. भाजपा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीसा न देता टपऱ्या काढल्या जात आहेत. मी मंत्री आसताना अनेक नगरसेवक माझ्याकडे आले मी त्यांना सन्मानाची वागणूक दिली.

निवडणूक पुर्व चाचणीत नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात येणार असा सर्व्हेचा अंदाज आहे. दिड वर्षात आमदाकडे गेलेले नगरसेवक परत आमच्याकडे येत आहेत त्यांचे स्वागत आहे. आणखीही बरेच जण येण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe