अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-माजी मंत्री राम शिंदे यांना कलेक्टर जावई मिळाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या मुलीसाठी चांगल्या मुलाच्या शोधात असताना या रेशीमगाठी जुळून आल्या.
विशेष म्हणजे राम शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर यांचा साखऱपुडा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाला. हे नातं जुळून आल्यामुळे सध्या शिंदे आणि खांडेकर हे दोन्ही कुटुंबं आनंदी आहेत. साखरपुड्याचा कार्यक्रम चौंडी येथे पार पडला.
श्रीकांत खांडेकर यांनी बी.टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली.
श्रीकांत याचा सत्कार माजी मत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले. यावेळी राम शिंदे यांना आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले. त्यानंतर हे नातं जुळून आले आहे.
राम शिंदे राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे त्यांना फार लक्ष देता यायचे नाही. पत्नी आशाताई यांनीच मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले.आशाताईंनी पतीवर मंत्रिपदाची जबाबदारी आल्यावर पुणं सोडलं नाही. त्याच कारणच मुळी मुलींचे शिक्षण होतं. त्यामुळेच थोरली मुलगी अक्षता एम.बी.एस. झाली.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरिबीशी झगडत श्रीकांत खांडेकर यांनी बीटेकचे शिक्षण दापोली येथून पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आय.ए.एस.होण्याच स्वप्न उराशी बाळगलं.
त्यांना या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले. ते आय.ए.एस. होत जिल्हाधिकारी झाले.त्यांच्या या प्रेरणादायी यशाचे कौतुक ग्रामस्थांनी नागरी सत्काराने करण्याचे ठरविले. हा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचा ठरले.
माजी मंत्री शिदेंनाही श्रीकांत यांनी गरिबीतून मिळविलेल्या यशाचे मोठे अप्रूप वाटले. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून येणाचे कबूल केले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या घरी राम शिंदे गेले.
श्रीकांत यांना अवघी नऊ एकर शेतजमीन आहे. त्यात तीन भावंडे.त्यांच्या आई-वडीलांनी कष्टाने मुलांना शिकवलं. मोठा मुलगा संतोष हा विवाहित असून एका पाईपच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे. धाकट्या महेशची बी.एस्सी. झालीय.
श्रीकांत बी.टेक करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय.ए.एस. झाले. त्या नागरी सत्कारातच माजी मंत्री राम शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची ओळख झाली. या कार्यक्रमातूनच सोयरीकीच्या नात्याची ‘वीण’ घट्ट होत गेली.
शिंदे-खांडेकर व्याही झाले. डॉ. अक्षता आणि जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा साखरपुडा झाला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हे नाते गुंफले गेले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved