वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी रामकिसन काकडे यांची फेरनिवड करण्यात आली.

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी 11 वाजता आदीनाथनगर येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात झाली.

चेअरमनपदासाठी राजळे यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी मांडली.राज्य साखर कामगार संघ, कारखान्याचा प्रशासन विभाग यांच्यावतीने नूतन पदाधिकार्‍यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी सहा वेळा कारखाना निवडणूक बिनविरोध करून संचालक मंडळाचे कामकाजाप्रती सार्वत्रिक विश्वास व्यक्त केला. विकासासह नकळत केलेल्या स्नेहभावाचा हा ओलावा आहे.

वृद्धेश्वर उद्योग समूह एक विशाल कुटुंब आहे. सभासद केंद्रबिंदू मानून त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा देऊ, नियोजित इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही चेअरमन आप्पासाहेब राजळे यांनी याप्रसंगी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News