माजी आमदारांच्या चिरंजीवांची वाढदिवसानिमित्त कोविड सेटरला मदत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांच्या वाढदिवसा निमित्त महामा फुले कृषी विद्यापीठातील कोव्हिड केअर सेंटर मध्ये कॉरंटाईन असलेल्या रुग्णाना अत्यावशक वस्तुचे वाटप करण्यात आले.

या मध्ये २७०० अंडी , ४०वाफेची मशिन,४ पॅकेट मास्क, तेल,साबन, ब्रश, कोलगेट साहीत्याचे २०० किट, ५ लीटर सैनीटाइझरचे १० कॅन इत्यादी. उपयुक्त साहित्य देण्यातआले.राज्यात कोरोनाचा कहर असुन जिल्हयासह राहुरी -नगर -पाथर्डी मतदार संघात मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या वाढली आहे.

ह्या रुग्णांना मदतीचा हात म्हणुन आमचे कडून प्रयत्न असुन हे सर्व रुग्ण बरे व्होऊन घरी जावेत हिच परमेश्वरास प्रार्थना. ह्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छाअसे मत कर्डीले यांनी व्यक्त केले.

त्याच बरोबर कोव्हीड सेंटर वर काम करणारे डॉक्टर, नर्स,कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या वेळी वैद्यकीयअधिकारी डॉ . दिपाली गायकवाड डॉ. गवते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,

निसारभाई शेख, गणेश खैरे, सुनिल देशमुख,जब्बार पठाण, प्रभाकर हरीशचंद्रे,मयुर गवळी,कुंदन बाचकर ,अदित्य दहीफळे,बाळासाहेब भगत,जिशान शेख,उमेश शेळके,सुनिल देशमुख, अमोल घाडगे,आफताब अत्तार,प्रतिक बानकर इत्यादी कार्यकर्ते हजर होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe