माजी आमदार मुरकुटे यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले!

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक व नुकताच भाजपला जय श्रीराम केलेले युवक नेते प्रकाश शेटे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या वतीने मुळा कारखान्यावर केलेल्या आंदोलनावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रकाश शेटे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, आजपर्यंत नेवासे तालुक्यात राजकीय स्वार्थासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना व जनतेला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वाऱ्यावर सोडले. शेटे म्हणाले,

सन २०१४ च्या विधानसभेला घुले पाटलांनी निवडून आणले म्हणून त्यांच्या कारखान्याची निवडणूक मी लढवली नाही, असे मुरकुटे हे भर सभेत म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब मुरकुटे यांचे शेतकरी प्रेम कोठे गेले होते.

बाळासाहेब मुरकुटे आमदार असताना गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती. त्यावेळेस त्यांनी शिंगणापूर देवस्थानची चौकशी केली. सर्व सत्ता यांच्या ताब्यात असताना देखील शिंगणापूर देवस्थान गडाखांच्या ताब्यात कुणी दिले?

अंधारात कुणी काय तडजोड केली हे सर्व तालुक्याला माहीत आहे.असे आरोप करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe