घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही – माजी आमदार राहुल जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी अहोरात्र झगडत राहणार असून

तालुक्याच्या विकास करण्यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू, तसेच मी कधीच घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही, असे माजी आमदार राहुल जगताप यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टिका केली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ कोटी १२ लाख रुपयांच्या काष्टी-अजनूज रस्ता ते माळवाडी रस्त्याचे भुमिपूजन गुरुवारी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते झाले.

जगताप म्हणाले, श्रीगोंदे तालुक्याला मागील काही वर्षे मंत्रिपद असताना देखील तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट होता. तालुक्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते.

मात्र मी विधानसभा सदस्य असताना रस्त्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊन चांगले काम केले. तालुक्यातील खड्डे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुक्त करण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील इतरही रस्त्यासाठी आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या वेळी माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, राकेश पाचपुते, बापू भुजबळ, नितीन थोरात, योगेशआबा गिरमकर, नाना कणसे, तुकाराम शिपलकर, अमोल गिरमकर, आबातात्या गिरमकर, कायगुडे अण्णा, माऊली जाधव, मोतीराम भुजबळ, किरण गायकवाड,

माधव शेळके, महेश कवडे, अनिल भुजबळ, महेश गिरमकर, राहुल पाचपुते, राजेंद्र गिरमकर, हनुमंत क्षीरसागर, पद्मसिंह क्षीरसागर, दत्ता गिरमकर, तेजस शिंदे, मच्छिंद्र जाधव, भानुदास कवडे, सुदामराव कुटे, अजिनाथ गिरमकर, रमेश गिरमकर, भारत भुजबळ, दीपक गिरमकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe