अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- असध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाच संसर्ग झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे.
नुकत्याच समजलेल्या माहितीनुसार शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/ramdas-kadam-1.jpg)
त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीचकँडी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह आठ राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एका दिवसात समोर आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत 68 हजार 020 रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|