अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- नेवासे येथील रानमळा परिसरात शेताच्या कडेला सापडलेला महागडा मोबाइल परत केल्याबद्दल मुळा कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.
मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे हे सपत्निक नेवासे येथील रानमळ्यातून घरी येत असताना चारी जवळ महागडा मोबाइल त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यावरून आलेल्या कॉलवरून नारायणराव लोखंडे यांनी संपर्क साधला असता त्यांना पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत विभाग कार्यरत असलेले डाटा ऑपरेडर किशोर खाटीक यांचा असल्याचे कळाले.
त्यांनी नेवासे पंचायत समितीमध्ये जाऊन सदरचा मोबाइल किशोर खाटीक यांना सुपूर्द केला. त्यांच्या या कार्याबद्दल अधिकारी वर्गाने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.
मुळा कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.
यावेळी मित्र मंडळाचे अॅड. बापूसाहेब गायके, पोपटराव जिरे, भाजपचे नेते अनिल ताके, सुनील धायजे, संचालक शिवा जंगले, सुनील जाधव, राजेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम