अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शॉर्टसर्कीट होऊन चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शहरागतच्या सेंटमेरी परिसरात काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
निंबाळे शिवारात सेंटमेरी चर्चच्या मालकीची शेतजमिन आहे. तोडणीस आलेला ऊस काल पेटला. या आगीत सुमारे चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

file photo
दिवसभर वारा मोठ्या प्रमाणात होता. त्यात आग लाल्याने काही क्षणात चार एकर क्षेत्र जळून गेले.
आग विझविण्यासाठी थोरात साखर कारखान्याचे व संगमनेर नगरपालिकाचे अग्नीशमक बंब घटनास्थळी लागलीच दाखल झाले.
त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चार एकर ऊस जळाला. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सेंटमेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|