अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- चोऱ्या, घरफोड्या, लूटमार, खुनाचा प्रयत्न आणि खुन करून पसार झालेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्यावर तब्बल ५१ गुन्हे दाखल आहेत.
या आरोपींकडून एक लाख ८० हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कृष्णा विलास भोसले, सुरेश पुंजाराम काळे, रावसाहेब विलास भोसले आणि अजिनाथ विलास भोसले अशी अटक करण्यात आलेल्या त्या चार जणांची नावे आहेत.
१ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या चौघांनी नगर- सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पेट्रोल पंपासमोरील उभ्या असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून २ लाख ५५ हजार ८०० रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
यासोबतच या आरोपींनी जयवंत शिवाजी फाळके यांच्या मालकीच्या फाळके ॲण्ड सन्स या भारत पेट्रोल पंपावर देखील दरोड टाकत १ लाख २३ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला होता.
हे सर्व आरोपी आष्टी तालुक्यातील हातवळण येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेत्यांना ताब्यात घेतले. या आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे तब्बल ५१ गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम