अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी दिलीप बाबासाहेब सांबारे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मयताच्या पत्नीलाच अटक झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत अधिक माहिती अशी, शनिवार ९ जुलै रोजी सावकारकीचे पैसे, आर्थिक अडचण व कौटुंबिक कारणातून कौठेकमळेश्वर शिवारात सांबारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
दरम्यान त्यांनी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानंतर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी पाचपैकी चार आरोपींना अटक केल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली आहे.
त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. या आरोपीत मयताची पत्नी अनिता दिलीप सांबारे, नानासाहेब श्रावण जाधव, मंदा बाळाजी जाधव, भीमा बाळाजी जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
वेणूनाथ सूर्यभान गोंदकर यांचा पोलीस शोध घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. सांबारे यांनी चिठ्ठीत १५ लाख रुपये व्यवहाराचा व सावकारकीचा स्पष्ट उल्लेख होता. त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याची चौकशी सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम