अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ तिरट नावाचा जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून चारजणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे १लाख३हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे मिटके यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता संतोष नवनाथ कुसमुडे (वय ३४वर्ष रा. कुसमुडे वस्ती वांबोरी ता. राहुरी), राहुल सतीश नन्नवरे (वय २१ वर्षे रा.राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी), शंकर सुखदेव कात्रज (वय ३८ वर्षे रा. गडाख वस्ती वांबोरी), किरण राजेंद्र कुसमुडे (रा. राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी) यांच्यासह १लाख ३हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अन्य दोनजण पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले आहेत. या सर्वांविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|