फळांच्या खाली लपवून आणला तब्बल पावणे चार कोटींचा गांजा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  फळांच्या खाली लपवून आणलेला तब्बल १ हजार ८७८ किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे पावणे चार कोटी रूपये आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये १ हजार ८७८ किलो गांजा पकडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरून टीएस ०७ यूएए ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले.

त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता. त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी किंमत होत असल्याचे सांगण्यात आले. तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्यांनी आंध्रप्रदेशातून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe