अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, मात्र यांना अटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा देखील अधिक परिश्रम घेत आहे.
नुकतेच 10 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणार्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/10/arrested-1.jpg)
पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 32 रा. बोल्हेगाव), नितेश शशीकांत काळे (वय 24), महेश राजेंद्र झीने (वय 24 दोघे रा. पिंपळगाव माळवी ता. नगर), देवेंद्र भगवान शर्मा (वय 28 रा. नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान या प्रकरणी शफी नसीर शेख (वय 61 रा. विळद ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शफी शेख यांचा मुलगा शौकत शेख हा त्याच्या चारचाकी वाहनातून जात असताना आरोपींनी त्याला अडविले.
शौकत याला आरोपी यांनी डांबून ठेवत शफी यांना फोन करून 10 लाख रुपये खंडोबाचा माळ येथे आणून दिले नाही तर मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. शफी यांनी सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी या प्रकरणाचा तपास करत शफी यांना सोबत घेऊन पोलिसांनी तपोवन रोडवरील नाना चौकातून शौकत याची सुटका करत अपहरण करणार्या चौघांना जेरबंद केले.
आरोपी पोलीस कोठडीत असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|