जिल्ह्यात नवीन चार अधिकाऱ्यांचे आगमन!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी नव्याने चार निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत. तर तीन पोलीस निरीक्षकांना मुदतवाढ मिळाली आहे.

नाशिक परिक्षेत्र स्तरावरील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्याबाबते आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी काल रात्री काढले.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, दौलत जाधव, वसंत पथवे यांची नाशिक ग्रामीण तर कोतवालीचे राकेश मानगावकर यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व अभय परमार यांना मुदतवाढ मिळाली आहे.

बदली झालेल्या चार निरीक्षकांच्या जागी जळगाव जिल्ह्यातून भिमराव नंदुरकर, नंदुरबार जिल्ह्यातून विजयसिंग राजपुत, नाशिक ग्रामीणमधून नरेंद्र भदाणे व गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यात बदली झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe