अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याला अटकाव करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे.
यातच राज्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान नगर तालुक्यातील सारोळा कासार या गावात वयोवृद्धांना कोरोना लसीकरण केंद्रात जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
गावातील ६० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक व ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी चास आरोग्य केंद्रात जाण्या-येण्यासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे सामाजिक भावनेतून मोफत वाहन, चहा, पाण्याची सुविधा पुरविण्याचा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमात गावातील १४० वयोवृद्धांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, लसीकरण केंद्रात जाण्याची सोय नाही त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक गरजू व वयोवृद्ध नागरिकांना इच्छा असूनही केवळ जाण्यायेण्याची सोय नसल्याने आरोग्य केंद्रात जाऊन लस घेता येत नाही.
ही बाब विचारात घेऊन सारोळा कासार येथे आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकवर्गणी करत या वयोवृद्धांसाठी सामाजिक भावनेतून मोफत वाहन, चहा, पाण्याची सुविधा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|