लग्नाचे अमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर वारंवार अत्याचार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-मुंबईत एका टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं अमिष दाखवून तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सदर अभिनेत्रीने मुंबईच्या ओशीवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे.

ज्यानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीने असे आरोप केले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करत तपास सुरू केला आहे. आपल्या तक्रारीत या अभिनेत्रीने सांगितले की,

संबंधित इसमाने तिला लग्न करण्याचे अमिष दाखवून तिचा अनेकदा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी तिच्या साक्षीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe