मारुतीपासून तर महिंद्रापर्यंत अनेक कंपन्या देत आहेत नवीन कार खरेदीवर भरघोस सूट! जाणून घ्या कोणत्या कारवर मिळत आहे किती सूट?

भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या कार सध्या उपलब्ध आहेत व ग्राहकांना देखील त्यांचा आर्थिक बजेट नुसार कार निवडीला अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी देखील यामुळे कार निवडणे सोपे होते.

Ajay Patil
Published:

Car Discount In December Month:- स्वतःची नवीन कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व आताचे तरुण-तरुणी तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबला लागले की लगेच कार घेण्याची तयारी करायला लागतात.

भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या कार सध्या उपलब्ध आहेत व ग्राहकांना देखील त्यांचा आर्थिक बजेट नुसार कार निवडीला अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी देखील यामुळे कार निवडणे सोपे होते.

या पद्धतीने तुम्हाला देखील या महिन्यामध्ये कार घ्यायची असेल तर हा निर्णय तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. कारण भारतातील काही प्रसिद्ध असलेल्या कार उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सवलत देण्यात येत आहे.

कंपन्यांना त्यांचा स्टॉक डिसेंबरमध्ये क्लिअर करायचा असल्यामुळे या सवलती देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही या महिन्यांमध्ये जर कार घेतली तर मारुती सुझुकी ते महिंद्रा व होंडा या प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या कार सवलतीवर खरेदी करू शकतात.

कोणती कंपनी देत आहे कोणत्या कारवर किती सूट?

1- मारुती सुझुकी- तुम्हाला जर मारुती सुझुकीची कार घ्यायची असेल तर या महिन्यात मारुती सुझुकी काही कार मॉडेल वर चांगली सवलत देत आहे. समजा तुम्ही मारुतीची अल्टो के 10 ही कार विकत घ्यायचे ठरवले तर या महिन्यात तुम्ही साधारणपणे 72 हजार 100 पर्यंत बचत करू शकतात.

याशिवाय मारुतीच्या एस प्रेसो या कारवर 76 हजार 953 रुपये तर वेगनर या कारवर 77 हजार रुपयापर्यंत सवलत मारुती सुझुकी कडून दिली जात आहे. तसेच तुम्हाला मारुतीची जुनी स्विफ्ट घ्यायची असेल तर त्यावर 35000 व नवीन स्विफ्ट वर 75 हजार रुपयापर्यंत सवलत मिळत आहे.

इतकेच नाहीतर तुम्ही जर या महिन्यांमध्ये मारुतीची ब्रेझा कार खरेदी केली तर तुम्ही 50 हजार रुपये पर्यंत पैसे वाचवू शकतात. तसेच मारुती जिमनीवर दोन लाख 50 हजार रुपयांपर्यंत, ग्रँड विटारा या कारवर एक लाख 80 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या कारवर मिळणारी सवलत ही एक्सचेंज, रोख तसेच कार्पोरेट बोनस, ॲक्सेसरीज आणि विशेष सवलतींचा यामध्ये समावेश आहे.

2- होंडा- मारुती सुझुकी ऐवजी तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये होंडा कंपनीच्या देखील कार खरेदी करू शकतात व सवलतीचा लाभ उठवू शकतात. होंडाच्या माध्यमातून सर्वात लोकप्रिय असलेली एसयूव्ही एलिव्हेटवर 95 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तसेच होंडाच्या कॉम्पॅक्ट सेडान कार असलेल्या अमेझवर एक लाख 26 हजार रुपये पर्यंतची बचत तुम्ही करू शकतात.

3- ह्युंदाई- तसेच डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला ह्युंदाईची कार खरेदी करायची असेल तर या महिन्यात कंपनीकडून ग्रँड i10 या कारवर ५८ हजार रुपये पर्यंत तर एक्सेटर वर 48000, ह्युंदाई औरा या कारवर 33 हजार तर i20 या कारवर 55 हजार रुपयापर्यंत सवलत देण्यात येत आहे.

तसेच कॉम्पॅक्ट SUV असलेल्या व्हेनूवर 76 हजार रुपये तर अल्काझर या कारवर 45 हजार रुपयापर्यंत सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे ह्युंदाई कंपनी तिच्या Ionic EV वर दोन लाख रुपयापर्यंत सवलत देत आहे.

4- महिंद्रा- महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून देखील या डिसेंबर महिन्यामध्ये काही कार वर चांगली सवलत दिली जात असून या महिन्यात तुम्ही जर बोलेरो खरेदी केली तर त्यावर एक लाख वीस हजार रुपयांची सवलत मिळेल व स्कार्पिओवर पन्नास हजार व महिंद्राच्या XUV700 वर ४०००० रुपये पर्यंत पैसे तुम्ही वाचवू शकतात. या सवलतीचा लाभ एक्सचेंज, कॅश तसेच कार्पोरेट, ॲक्सेसरीज व विशेष सवलतीच्या रूपाने मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe