महाराष्ट्रात पडणार धो- धो पाऊस ! हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज

सध्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज असून त्या भागात 15 ऑगस्ट पासून म्हणजेच कालपासून पाऊस वाढेल असा एक अंदाज असून राज्यातील इतर ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे

Updated on -

Maharashtra Rain:- राज्यातील बऱ्याच भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. म्हणजेच जोराचा पाऊस पूर्णपणे कमी झाला असून काही ठिकाणी रिमझिम  स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून कमाल तापमानात देखील तब्बल आठ ते दहा अंशांनी वाढ झाल्यामुळे उकाडा देखील मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

अशा स्थितीमध्ये राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे आगमन केव्हा होईल? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परंतु याबाबत हवामान शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून येथे दहा ते बारा दिवसांनी राज्यात पुन्हा चांगल्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे.

 राज्यात पुन्हा एकदा बरसणार मुसळधार पाऊस?

सध्या राज्यातून मुसळधार पाऊस गायब झाला असून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. तसेच तापमानामध्ये देखील आठ ते दहा अंशांनी वाढ झाली असून उकाडा जाणवत आहे.

परंतु उघडीप दिलेला पाऊस पुन्हा दहा ते बारा दिवसांनी बरसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. सध्या जर आपण राज्यातील कमाल तापमान पाहिले तर कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ते 21 ते 22 अंशावरून ते 30 ते 31 अंशावर गेले आहे.

सध्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज असून त्या भागात 15 ऑगस्ट पासून म्हणजेच कालपासून पाऊस वाढेल असा एक अंदाज असून राज्यातील इतर ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे

व याबाबत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी महत्वाची माहिती दिलेली असून त्यानुसार बघितले तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात 94 ते 100% पाऊस बरसणार आहे.

 19 ऑगस्ट पासून पाऊस वाढण्यास होईल सुरुवात

जर आपण ऑगस्ट महिन्याची सुरुवात पाहिली तर ती चांगल्या पावसाने झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 53% पर्यंत पाऊस झाला. त्यानंतर नऊ ते दहा ऑगस्टपासून राज्यातील मोठा पाऊस कमी व्हायला सुरुवात झाली.

आता राज्यात 18 ऑगस्टपर्यंत सर्वत्र रिमझिम पावसाचा अंदाज आहे व 19 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. केरळ ते गुजरात राज्याच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार असा पाऊस झाला.

परंतु सध्या स्थितीत राज्यात कमी दाबाचे पट्टे विरले असून त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे व त्याचाच परिणाम हा आठ ते दहा अंशांनी  तापमानात वाढ झाल्यात दिसून येत आहे. 19 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!