आजपासून केवळ आठ आराेग्य केंद्रांवरच लस दिली जाणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- आजपासून केवळ आठ आराेग्य केंद्रांवरच लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलबध करून दिले जाणार आहेत.

दरम्यान महापालिकेने प्रभागनिहाय सुरू केलेली लसीकरण तात्पुरती बंद केले आहे. शहरात सातत्याने लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे.

तसेच अनेक ठिकाणी नागिरकांची होणारी धावपळ पाहता प्रभानिहाय लसीकरण केंद्रांची मागणी करण्यात आली होती.

नगरसेवकांच्या मागणीनुसार महापालिकेने शहरातील विविध भागात २० नवीन उपकेंद्र सुरू केली होती. या केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते.

लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्याने लसीकरणाचा पुरता गोंधळ उडाला होता. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केवळ मनपाच्या आठ उपकेंद्रांवरच लसीकरण करण्याचा आदेश दिला.

त्यामुळे शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर केले जाणारे लसीकरण बंद करण्यात आले असून, मनपाच्याच आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जाणार आहे.

मनपाच्या आठ उपकेंद्रांवरच लसीकरण होणार

  • महात्मा फुले आरोग्य केंद्र
  • तोफखाना आरोग्य केंद्र
  • सावेडी आरोग्य केंद्र
  • केडगाव आरोग्य केंद्र
  • आयुर्वेद आरोग्य केंद्र
  • नागापूर आरोग्य केंद्र
  • भोसले आखाडा आरोग्य केंद्र
  • मुकुंदनगर आरोग्य केंद्र
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe