अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर येथे महापालिका व नगरपरिषदा यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती.
यावेळी आमदार लहू कानडे यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण प्रलंबित कामांचा आढावा येथे मांडला. व त्यासाठी आवश्यक निधीसाठी विकासमंत्र्यांना निवदेन दिले.
श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपरिषद यांच्यासाठी आवश्यक त्या रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन आ. लहू कानडे यांनी नगर विकासमंत्र्यांना दिले.
यामध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेसाठी 24 कोटी तर देवळाली नगरपरिषदेसाठी सात कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेत आयोजित बैठकीत आमदार कानडे म्हणाले कि, श्रीरामपूर येथील विस्तीर्ण अशा पाणी साठवण तलावाला आच्छादन नसल्याने गाळमिश्रित पाणी श्रीरामपूरकरांना प्यावे लागते.
त्यासाठी नगर विकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच घनकचरा यावर वेगाने प्रक्रिया होत नसल्याने कचर्याचे ढीग साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. सदर चे प्रश्न सोडवण्यासाठी नगर विकास विभागाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी आ. कानडे यांनी केली.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved