मयत कोरोना रुग्णांवर सावेडीच्या कचराडेपोत होणार अंत्यविधी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच नगर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातून कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी शहरात येत आहेत.

उपचार घेत असताना काही कोराना रूग्‍णांचा दुदैवी मृत्‍यू होत आहे. त्‍यामुळे नालेगांव अमरधाम येथे अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण निर्माण झाला आहे.

यासाठी नुकतेच जिल्‍हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांचे समवेत सावेडी कचरा डेपो येथे पाहणी करून कोरोना रूग्‍णावर अंत्‍यविधी करण्‍यासाठी सुचना दिल्‍या होत्या.

त्यानुसार आज कचरा डेपोच्‍या शेड मधील साफ सफाई करून अंत्‍यविधीला सुरूवात करण्‍यात येणार असल्‍याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर म्‍हणाले की, सावेडी कचरा डेपोमुळे या भागाच्‍या वि‍कास कामावर मोठा परिणाम झाला होता.

कचरा डेपोच्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम झाला होता. वारंवार कचरा डेपोला लागलेल्‍या आगीमुळे दुर्गंधी पसरली जात होती. त्‍यामुळे या भागातील नागरिकांच्‍या विरोधामुळे डेपो व खत प्रकल्‍प बंद केला आहे.

आ.जगताप यांच्‍या प्रयत्‍नातून या जागेवर स्‍मशानभूमी व उदयानासह इतर प्रकल्‍प प्रस्‍तावित करण्‍याचे ठरावही मनपाने केला आहे. दरम्यान सध्याच्या स्थितीला तातडीने याभागामध्‍ये कोरोना रूग्‍णांचे अंत्‍यविधी होणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe