अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडले.
दरम्यान महापालिकेचा लाचखोर आरोग्य अधिकारी पैठणकर याच्याकडे काल दिवसभरात सुमारे 55 लाख रुपयांच्या मालमत्ता असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना घनकचरा व्यवस्थापन प्रमुख असलेल्या नरसिंह पैठणकर याला काल बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सावेडीत रंगेहात पकडले होते.
त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी पोलिसांनी केली. अधिकाऱ्याकडे आढळून आली गडगंज संपत्ती या लाचखोर अधिकाऱ्याकडे बुर्हाणनगरला दोन प्लॉट,
निर्मलनगरला बंगला, प्लॉट आणि तीन लाखाची एफडी,नऊ तोळे सोने असल्याचे समोर आले.निर्मलनगरमध्ये तो राहत असलेल्या बंगल्यामागेच असलेला प्लॉट शाळेसाठी देण्यात आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
काल दिवसभरातील पोलीस चौकशीत पैठणकर याच्याकडे सुमारे 55 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान त्याच्याकडील आणखी मालमत्तांची चौकशी करून शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved