अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना गुरुवारपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली .
केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. सोनू उर्फ रूपेश सुधाकर भालेराव (२१),
रोहन सतिष शिंदे (२१), कुणाल सुधाकर भालेराव (१९, तिघेही राहणार पंचशिलनगर, रेल्वेस्टेशन रोड, नगर) आणि अनुज सुधाकर उजागरे (२२, रा. ताराबाग कॉलनी, केडगाव) तसेच दोन अल्पवयीन बालके अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सोनू भालेराव, रोहन शिंदे, कुणाल भालेराव आणि अनूज उजागरे यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १७ जूनपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपींकडून दोन दुचाक्या, लोखंडी धारदार सत्तुर, लोखंडी गज आणि मिरची पुड असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम