अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीचे व्यसनच जणू लागले आहे. जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग लाचखोरीमध्ये अव्वल आहे. यातच खासगी कंपन्यांमध्ये देखील लाचखोरी फोफावत आहे.
कर्जतमध्ये तर एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी शेतकऱ्यांना लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कर्जत येथील कार्यालयाबाहेर गांधीगिरीने सत्कार केला.
त्याचा व्हिडिओ करून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ऑफशोअर इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा हा कर्मचारी होता. याबाबत बोलताना यादव म्हणाले की, या कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांना अनेक वेळा लाच मागण्यात येत होती.
मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. त्यामुळे गांधीगिरी आंदोलन करावे लागले. दरम्यान अखेर कंपनीच्या वरिष्ठांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला.
त्यांच्याकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत कर्जत येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. आता काय कारवाई होती याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम