कोपरगावातून स्टील चोरी करणाऱ्या गट्या गँगच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोपरगाव शहरातून तीन ठिकाणी चोरी करून सव्वा लाख रुपये किमतीचे १३०० किलो स्टील चोरणाऱ्या गट्या गँगच्या कोपरगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

या गँगने चोरलेले स्टील साईसिटी येथून जप्त करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील राजेश शांतीलाल कोकणी यांच्या ाचे साईसिटी येथील बांधकामावरील स्टील,

कचरु भास्कर निकम यांचे १७० किलो स्टील गज व निरज मदनलाल कासलीवाल यांच्या दुकानातून ३५० किलो स्टील गज या गँगने चोरुन नेले होते.

या तिन्ही गुन्हयाचा तपास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोहेका ३९१ आर पी पुंड, पोका एस. जे. अग्रवाल हे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे करत होते.

उपनगरातील खडकी येथील रहिवासी गट्या उर्फ विशाल राजेंद्र शिदे (१८ )यास ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याने स्टील चोरी करणारे टोळीतील इतर साथीदार ,

दिपक अर्जुन दवंगे (१९), मुकेश मुनिर शेख (२१), सोमनाथ भाउलाल सुराशे (१९), मुकुंदा ज्ञानेश्वर पवार वय २४ वर्ष, पवन रमेश भालेराव (१८),

आकाश अंकुश खरात (२१) यांचे मदतीने तिन्ही ठिकाणचे स्टील अपरात्री चोरुन ते साईसिटी येथील काटवनात नेऊन ठेवले होते.

त्याना या गुन्हयात अटक करुन त्यांनी लपवून ठेवलेले एक लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे १३०० किलो स्टील साईसिटी येथुन जप्त केेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe