अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- सध्या बाजारात कांद्याची जोरदार पिछेहाट सुरू झाली आहे.सर्वच बाजारसमित्यात कांद्याला सर्वसाधारणपणे २४०० रुपयांच्या पुढे दर मिळत नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र प्रचंड तणावाखाली आला आहे.मात्र त्यात एक दिलासादायक बाब समोर येत आहे ती म्हणजे एकीकडे कांदा गडगडत असताना दुसरीकडे पालेभाज्यांची आगेकुच सुरू झाली आहे.
काल नगर येथील बाजार समितीत गवारीच्या शेंगाला तब्बल १०० रूपये प्रतिकीलो एवढा दर मिळाला आहे.त्यामुळे भाजीउत्पादक शेतकऱ्यांच्या काहीतरी का होईना मिळेल अशी अशा पल्लवीत झाल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी कांदा तब्बल ८ हजार रूपयांवर गेल्याने अनेकांनी अत्यंत महागड्या दराने बियाणे खरेदी केले. मात्र यात अनेक शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक झाली.
अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे बियाणे उगवलेच नाही. तर काहींची अत्यंत कमी उगवले. त्यातच परत खर्च करून कसाबसा कांदा जगवला मात्र आता कांदा कोसळल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. मागच्या आठवड्यापासून जसा उन्हाचा कडाका वाढू लागला आहे तसे भाजीपाल्यांच्या दरात चढ उतार सुरू झाले आहेत. आज नगर येथील बाजार समितीत गवारीच्या शेंगाला १०० रूपये प्रतिकिलोचा दर मिळला आहे. त्याचसोबत इतर भाजीपाला देखील काही प्रमाणात वधारला आहे.
बाजार समितीत मिळालेले दर :टोमॅटो ५०० – १०००,वांगी ५०० – १०००,फ्लावर ५०० – १०००, कोबी ४०० – ५००,काकडी १००० – २०००, गवार ७००० – १०,०००, घोसाळे २००० – २५००, दोडका १००० – ३०००,कारले २००० – ३२००,कैरी ३००० – ४०००, भेंडी २००० – ३५००,वाल २५०० – ३५००,
घेवडा २००० – २५००,तोंडुळे २००० – २२००,डिंगरी १५०० – २२००, बटाटे ५०० – १२००,लसूण ४००० – ६०००, हिरवी मिरची ३००० – ४०००, शेवगा १५०० – २५००, गाजर १००० – १५००, लिंबू ३००० – ४०००, शिमला मिरची १५०० – २५००, मेथी ४०० – ५००, कोथिंबीर ४०० – ६००, वाटाणा २५०० – २६००.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|