खरेदीसाठी सज्ज व्हा… सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-राष्ट्रीय राजधानीत सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 679 रुपयांची घसरण नोंदली गेली.

यामुळे दिल्लीत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,760 रुपये झाली होती. तर तयार चांदीचा दर 1,847 रुपयांनी कमी होऊन 67,073 रुपये प्रति किलो झाला.

या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटी संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वधारले.

त्यामुळे सोन्याची आयात स्वस्त झाली आहे. या कारणामुळे भारतात मंगळवारी या दोन धातूच्या दरामध्ये मोठी घट झाली. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,719 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर कमी होऊन 26.08 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.

मागील वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली.

मागील वर्षी सोन्याने 43% रिर्टन दिले होते. उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचे दर 24 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत, म्हणजेच ते साधारण 11,200 रुपयांनी स्वस्त होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe